या शर्यतीचा थरार एकदा! बैल आणि रेड्याची अस्सल कोल्हापुरी चिखल गुट्टा स्पर्धा...

या शर्यतीचा थरार एकदा! बैल आणि रेड्याची अस्सल कोल्हापुरी चिखल गुट्टा स्पर्धा...

कोल्हापुरात चिखल गुट्ट्याचा थरार रंगला... पश्चिम महाराष्ट्राकडच्या लोकांना हा प्रकार नवीन नाही... मात्र ज्यांनी गावाकडचा हा अस्सल थरार आजवर अनुभवला नसेल, त्यांच्यासाठी खास रिपोर्ट... थेट कोल्हापूरच्या मातीतून...

हिरवाईने नटलेलं शेत-शिवार... दुतर्फा जमलेली गर्दी.... शेतात खणलेला चर... शर्यतीसाठी सज्ज झालेली.. बैल आणि रेड्याची जोडी... उतावळे प्रेक्षक.. गावाकडचे हौशी कॅमेरामन.... आणि हुई... शाब्बास म्हणत सुरु झालेला थरार... 
एकदम सुस्साट... 
चिखल तुडवीत... काळजाचे ठोके चुकवीत रंगलेला हा थरार आहे, चिखल गुट्ट्याचा... पश्चिम महाराष्टाच्या मातीतला अस्सल फॉर्म्युला वन.

शेतीची कामं उरकल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं... शेतात चर खणला जातो... त्यामध्ये पाणी टाकून चिखल केला जातो... बैल आणि रेडा जोडीचं अनोखं कॉम्बिनेशन एकत्र पळवलं जातं....

या खेळाचा नियम सोपा आहे... ज्या शेतकऱ्याची बैल जोडी कमीत-कमी वेळात अंतर कापेल, तो ही स्पर्धा जिंकतो... 

आपल्या कृषीप्रधान देशातला हा शेतीला पूरक असा खेळ... बळीराजाचा विरुंगुळा तर बैल आणि रेड्याची शेतीच्या कामांची रंगीत तालिम... 

कोल्हापूरच्या मातीला शोभणारा हा रांगडा खेळ.. चिखल गुट्टा...

Web Title - bull Running Compitition 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com